औरंगाबाद : मुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन तीव्र होत आहे. सरकार दरबारी त्यांच्या व्यथा मांडून देखील त्यांना योग्य प्रतिसाद मिळलेला नाही . शिक्षकांची ही नाराजी बघता औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नावे पत्रक काढून इशाराच दिलाय. महाविकास आघाडीत सामील असलेल्या पक्षाच्या आमदाराने काढलेल्या पत्रकामुळे सरकारला घरचाच आहेर दिला आहे.
२९ जानेवारीपासून शाळा अनुदानासाठी शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. यात एक हजारापेक्षा जास्त शिक्षक आंदोलनात सामील आहेत. सर्व शिक्षक आमदार शिक्षण मंत्र्यांकडे वारंवार शाळा अनुदानासाठी पाठपुरावा करत आहे. परंतु शिक्षण विभागाकडून, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची फरपट होत आहे.
शिक्षण विभागाने शुक्रवारी शाळा अनुदानाच्या यादीचे तुकडे करून फक्त माध्यमिक शाळांचीच यादी का प्रसिद्ध केली. तसेच प्राथमिक व उच्च माध्यमिकची एकत्रित यादी प्रसिद्ध का केली नाही.? असा प्रश्न आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केलाय. इतकच नाही तर सध्या २०% अनुदान घेत असलेल्या शाळा आता अपात्र कशा काय होऊ शकतात, या पाठीमागे कोणाचा हात आहे याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय.
शाळांबंधीच्या सर्व तपासणीसाठी ३ महिने घालवून सुद्धा अजूनही शाळांमध्ये त्रुटी कशा काय राहिल्या आहेत. म्हणजे आपल्याच विभागाच्या अधिकाऱ्यानी नीट काम केले नव्हते का ? असा प्रश्न आमदार काळे यांनी उपस्थित केलाय. अघोषित सर्व शाळा आणि वर्ग तुकड्या यांना फक्त घोषित न करता वेतन अनुदानाच्या तरतुदीसह घोषित करावे, सर्व विनाअनुदानित कर्मचाऱ्यांना वेतन सुरू करून दिलासा द्यावा असेही काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही ७० वर्षांत काय केलं, याचा हिशोब आणलाय का’
- ‘काहीही लिहू नका, तिला स्वर्गात शांतपणे राहू द्या’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- आंदोलनासाठी दीर्घकाळ सार्वजनिक जागेचा ताबा घेणे चुकीचे; सुप्रीम कोर्टाने आंदोलकांना सुनावले खडेबोल
- ‘शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का’?
- फेसबुक करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण स्मार्टवॉच बाजारात आणण्याची तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
