Share

मी माजी पंतप्रधानांचा मुलगा असलो तरी तत्वासाठीची लढाई सोडून देणार नाही

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षावर केला जाणारा घराणेशाहीचा आरोप खोडून काढला आहे. त्यांनी म्हटले आहे की गेल्या तीस वर्षांपासून गांधी घराणे सत्तेपासून दूर राहिले आहे. या तीस वर्षात किमान पंधरा वर्षे कॉंग्रेसकडे सत्ता असूनही गांधी घराण्यातील माणूस पंतप्रधान झालेला नाही असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप होत असला तरी आणि मी स्वता एका माजी पंतप्रधानांचा मुलगा असलो तरी मी तत्वासाठीची लढाई सोडून देणार नाही असेहीं त्यांनी स्पष्ट केले.

शिकागो विद्यापीठातील एक प्राध्यापक दिपेश चक्रवर्ती यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या चर्चेच्यावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आपल्याला सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असले तरी मी हे ट्रोलिंग मार्गदर्शन म्हणून घेतो त्यातून मला शिकता येते आणि भूमिका ठरवता येते असे ते म्हणाले. आजी इंदिरा गांधी आणि वडिल राजीव गांधी यांनी देशाचे काहीं तरी वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे त्यांचा मला अभिमान आहे. त्यांच्यापासून मला मी नेमके काय केले पाहिजे याची प्रेरणा मिळते असेही त्यांनी या लाईव्ह चर्चेच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत युपीए 2 नंतर कॉंग्रेस का हरली याचेही विश्‍लेषण राहुल गांधी यांनी केले. ते म्हणाले की,आम्ही या देशाला शतकातील पहिल्या भागात चांगली व्हीजन दिली, आम्ही हरितक्रांती केली, आम्ही आर्थिक उदारीकरण केले. सन २००४ नंतरही आम्ही एक विशिष्ट दृष्टीकोन ठेऊन राज्य केले. आम्ही देशाला वेगवेगळ्या टप्प्यात विकासाची वेगवेगळी व्हीजन दिली पण सन २०१२ सालानंतर आम्ही नवीन व्हिजन देऊ शकलो नाही. त्यावेळीही देशासाठीची नवीन व्हिजन आम्ही देणे गरजेचे होते.

आमच्या सरकारकडून काही चुकाहीं झाल्या आणि सन २००८ साली देशाला जागतिक आर्थिक मंदीचा मोठा फटका बसला. या साऱ्या स्थितीचा कॉंग्रेसला फटका बसला. नरेंद्र मोदी देशासाठी नवीन व्हिजन घेऊन आले होते पण त्यांचे हे व्हिजन देशासाठी विनाशकारी ठरले. आता आमच्यापुढे देशासाठी नवीन व्हिजन आणून देशाला पुढे आणण्याचे काम करायचे आहे असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!