🕒 1 min read
चेन्नई- चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ८८ षटकात ६ बाद३०० धावा केल्या आहेत.
भारताकडून पहिल्या दिवसाखेर रिषभ पंत ५६ चेंडूत ३३ धावांवर नाबाद आहे. तर अक्षर पटेल ७ चेंडूत ५ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडकडून पहिल्या दिवसाखेर जॅक लीच आणि मोईन अलीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ऑली स्टोनने १ विकेट घेतली.
रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे सातवे शतक ठरले आहे. रोहितने यावेळी १३० चेंडूंमध्ये आपेल शतक साजरे केले.श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चारही संघांविरूद्ध सर्व फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा रोहित पहिला खेळाडू ठरला.
घरच्या मैदानावर कमीत कमी १० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सरासरीच्या बाबतीत रोहितने जगात दुसरं स्थान पटकावलं. या यादीत ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन ९८.२ च्या सरासरीने अव्वल आहेत. तर रोहितची सरासरी ८४.७ इतकी आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार हे दिलदार राजकारणी, सुशीलकुमार शिंदेंनी उधळली स्तुतिसुमने
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
- शिवसेनेत आलेले तनवाणी आहेत तरी कुठे!
- आज मी जो काही आहे तो शरद पवारांमुळेच – सुशीलकुमार शिंदे
- विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा, आरोपी फरार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
