Share

‘या’ महिला खासदारांनी आपल्या जबरदस्त भाषणाने अवघी संसद दणाणून सोडली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यसभा आणि लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व खासदारांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडले. दरम्यान, अनेक खासदारांची भाषणे व्हायरल झाली. या व्हायरल भाषणांवर लेख लिहून मिम्स  बनवले गेले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणापासून ते पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत भावनिक होण्यापर्यंत बरेच काही घडले आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची तर बजेटमुळे देशभर चर्चा झालीच पण या व्यतिरिक्त आता आम्ही तुम्हाला काही महिला खासदारांच्या भाषणाबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या भाषणाची देशभर चर्चा झाली आहे.

महुआ मोइत्रा-

या महिला खासदारांपैकी पहिले नाव महुआ मोइत्रा आहे. महुआ पूर्वी कॉंग्रेसमध्ये होत्या. त्यानंतर टीएमसीमध्ये आल्या.पुढे विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा मोईत्रा करीमपूर विधानसभेच्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडल्या गेल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना कृष्णा नगरमधून तिकीट दिले. निवडणूक जिंकल्यानंतर मोइत्रा खासदार झाल्या. यूएपीए कायद्याच्या गैरवापरांपर्यंत फासीवादाच्या सात लक्षणांबद्दल केलेले भाषण चांगलेच गाजले. त्यांनी केलेले भाषण एवढे भाजपला झोंबले कि त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी भाजपने केली.

हरसिमरत कौर बादल-

हरसिमरत कौर बादल शिरोमणी अकाली दलातील आहेत. बठिंडा या पंजाबच्या लोकसभा मतदारसंघाचे त्या नेतृत्व करत आहेत. जेव्हा शिरोमणी अकाली दल भाजपाप्रणीत एनडीएत मित्रपक्ष होता, त्यावेळी मोदी मंत्रिमंडळात हरसिमरत कौर यांना केंद्रीय मंत्रीपदाचा दर्जा मिळाला होता. त्यांनी अन्न प्रक्रिया मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. गेल्या वर्षी 17 डिसेंबरला मोदींनी शेतकरी कायद्याच्या निषेधार्थ मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यांचा पक्षही एनडीएपासून दूर गेला. या अधिवेशनात त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.त्यांच्या भाषणाची देखील जोरदार चर्चा झाली.

मीनाक्षी लेखी-

मीनाक्षी लेखी या भाजपच्या खासदार आहेत. नवी दिल्ली लोकसभा मतदार संघाच्या त्या नेतृत्व करत आहेत.त्या व्यवसायाने वकील आहेत.10 फेब्रुवारी रोजी त्यांनी लोकसभेत भाषण केले. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा बचाव करताना त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.लेखी यांच्या भाषणाची देखील जोरदार चर्चा झाली.

स्मृती इराणी-

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत राहुल गांधींवर हल्लाबोल केला. केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत म्हटलं की, सज्जन पाठ दाखवून गेले. बस सेवा चांगली करण्यासाठी १८,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यांनी बस सुविधा चांगली करण्यावर चर्चा केली नाही. सत्य हे आहे की अमेठीमध्ये ३० वर्षात एकही बस स्थानक बनलं नाही. चर्चा करा. दूध का दूध आणि पाणीचे पाणी होईल. बजेट देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आहे. कृषी कायदे संसदेत मंजूर झाले आहेत. मग त्यांना काळे कसे म्हणता येईल? असा थेट सवाल त्यांनी केला. इराणी यांच्या या भाषणाची देखील जोरदार चर्चा झाली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!