Share

शिवसेनेत आलेले तनवाणी आहेत तरी कुठे!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपला रामराम ठोकणारे, तडकाफडकी मातोश्रीवर जात पुन्हा शिवबंधन हातात बांधणारे शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी हे सध्या शिवसेनेच्या कोणत्याच कार्यक्रमात अथवा मंत्र्याच्या दौऱ्यात दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेत गेलेले तनवाणी आहेत तरी कुठे हा प्रश्न उपस्थित झालाय.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने तनवाणी यांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे तनवाणी यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमधून उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ते भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष होते. या निवडणुकीत शिवसेना-भाजप यांनी युती केल्याने त्यांना तिकीट मिळाले नव्हते. या निवडणुकीदरम्यान त्यांनी युतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा प्रचार केला होता.

निवडणूक संपताच काही दिवसांनी त्यांचा भाजप मधील शहर जिल्हाध्यक्षचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांना पुन्हा शहर जिल्हाध्यक्ष व्हायचे होते. परंतु शहर जिल्हाध्यक्ष पद संजय केनेकर यांना गेल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि स्वगृही परत जात हातात शिवबंधन बांधले. शिवबंधन बांधल्यानंतरही ते शिवसेनेच्या कार्यक्रमात अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या दौऱ्यात सक्रियपणे दिसून आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!