🕒 1 min read
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते शरद पवार आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यातील मैत्री राज्याला माहिती आहे. या दोघांतील मैत्रीच्या आठवणीला आज सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.
तुम्हाला वाटत असेल की आमच्यात अंतर आहे. मात्र आज त्यांनी दाखवून दिले आहे की आमच्यात कोणतंही अंतर नाही. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी मला सरकारमध्ये घेतलं नाही म्हणून मी शेतीच्या मार्गावर लागलो. आज जवळजवळ 34 एकर माझी शेती आहे. एखाद्याला पुढं रेटायचं, त्याचं गुणगान करायचं यात शरदरावांचा हात कोणी धरु शकत नाही. एखाद्याच्या विषयी त्यांनी मनात घेतलं तर ते पुढे ढकलतात. अशा शब्दांत सुशीलकुमार शिंदेंनी पवारांचे कोतूक केले आहे.
1978 साली आम्ही एकत्र होतो असं सांगत सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, ‘शरदरावांनी मला निवडणुकीला उभं केलं आणि पैसेही दिले. त्यांनी दिलेले 20 हजार रुपये मी परत द्यायला गेलो तेव्हा त्यांनी ते मला परत पाठवले. पण 4 हजार रुपये मी त्यांना परत दिले होते. असे पवार दिलदार राजकारणी आहेत. शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे, असं सरतेशेवटी सुशीलकुमार शिंदे म्हणाले.आज मी जो काही आहे ते शरद पवारांच्यामुळेच’.
महत्वाच्या बातम्या
- कर वसुलीसाठी पोलिसांची मदत घ्या, उस्मानाबाद नगराध्यक्षांचे निर्देश
- विधानसभा अध्यक्षपदाबाबत पवार-ठाकरे निर्णय घेतील, एकनाथ शिंदेंनी कॉंग्रेसचा उल्लेख टाळला
- बासरी वादनाने नाट्य परिषदेच्या मासिक सभेस प्रारंभ
- पूजा चव्हाण प्रकरणी त्या मंत्र्याची एकनाथ शिंदेकडून पाठराखण
- आज मी जो काही आहे तो शरद पवारांमुळेच – सुशीलकुमार शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
