🕒 1 min read
औरंगाबाद : केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अॅक्सेस रोड होणार असल्याची घोषणा केली आहे. शनिवारी पुणे दौऱ्यावर असताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद-नगर-पुणे या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. तसेच दिवसेदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढतच आहे. त्यामुळे पुणे-नगर महामार्गावर प्रस्तावीत डबल लेन पूलाचे काम येत्या ६ महिन्यात सुरु होणार आहे.
मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा महामार्ग म्हणजे औरंगाबाद-नगर-पुणे महामार्ग. या रस्त्यावरुन दिवसरात्र वाहतूक होत आसते. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्वाचा महामार्ग आहे. या रस्त्यावरील पुणे-शिरुर महामार्गाच्या अनेक तक्रारी येत आहेत. तसेच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पुणे- नगर महामार्गावर डबल लेन पूल करायला सांगितले होते. यासाठी गडकरीनी १६ लेनच्या रस्त्याचे डिझाईन सुद्धा करायला सांगितले होते. आगामी ६ महिन्यांत या कामांना काम सुरुवात होईल असे यावेळी गडकरी यांनी सांगितले.
पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अॅक्सेस रोड झाला तर नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागणार आहे. तसेच यावेळी गडकरीनी बोलताना सांगितले की, आम्ही मुंबई ते दिल्ली असा हा बारा लेनचा महामार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे मुंबई-दिल्लीपर्यंत अंतर १२-१३ तासांत कापता येईल. तसेच सुरतपासुन नवा हायवे केल्याने पुणे,मुंबई, नगर, नाशिक महामार्गावरची ट्रॅफिक कंजेशन आणि प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आज मी जो काही आहे तो शरद पवारांमुळेच – सुशीलकुमार शिंदे
- विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा, आरोपी फरार
- पहिला मंगला विंचुर्णे बर्दापूरकर स्मृती पुरस्कार राखी तांबटला प्रदान
- कर वसुलीसाठी पोलिसांची मदत घ्या, उस्मानाबाद नगराध्यक्षांचे निर्देश
- विधानसभा अध्यक्षपदाबाबत पवार-ठाकरे निर्णय घेतील, एकनाथ शिंदेंनी कॉंग्रेसचा उल्लेख टाळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
