Share

विधानसभा अध्यक्षपदाबाबत पवार-ठाकरे निर्णय घेतील, एकनाथ शिंदेंनी कॉंग्रेसचा उल्लेख टाळला

Published On: 

अहमदनगर : विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या जागेवर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचा नेता विराजमान होणार यावरून अनेक कयास बांधले जात आहेत. राज्यात सरकार स्थापन करताना हे पद कॉंग्रेसच्या पदरात पडले होते. मात्र, आता पटोले यांच्या राजीनाम्यानंतर ‘आता नवीन विधानसभा अध्यक्ष ठरवण्यासाठी पुन्हा चर्चा होणार. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते आता खुलं झाले आहे’. अस म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देखील उत्सुक असल्याचे संकेत दिल्यावर महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आता यावर आता केवळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील, असे शिवसेनेचे नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या विषयावर बोलताना मंत्री शिंदे यांनी काँग्रेसचा नामोल्लेख टाळत, या पदाचा पवार व ठाकरे हेच निर्णय घेतील असे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच होते, त्यामुळे या पदावर काँग्रेसच्याच व्यक्तीची नियुक्ती होईल, असे काँग्रेसचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरवारीच अहमदनगर मध्ये सांगितले होते. याला एकनाथ शिंदे यांनी नगरमध्ये जाऊनच कॉंग्रेसचा उल्लेख टाळत उत्तर दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!