Share

बासरी वादनाने नाट्य परिषदेच्या मासिक सभेस प्रारंभ

Published On: 

🕒 1 min read

बीड : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बीड शाखेच्या वतीने नियमित आयोजित मासिक संगीत सभेस पुन्हा सुरुवात झाली आहे. बीड येथील बासरी वादक अमर डागा यांनी आपल्या सुश्राव्य बासरी वादनाने उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ.दीपा क्षीरसागर यांनी यात पुढाकार घेत आता दर महिन्याला मैफिल आयोजित करण्याची घोषणा केली. त्यांच्या आणि ज्येष्ठ रंगकर्मी वासुदेवराव निलंगेकर, महेश वाघमारे, डॉ.संजय पाटील-देवळाणकर, डॉ. उज्वला वनवे यांच्या हस्ते नटराजपूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

बीडच्या नाट्य परिषद शाखेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या ११ तारखेला मासिक संगीत-नाट्य-साहित्य सभेचे आयोजन केले जाते. यात स्थानिक कलावंत आपली कला तर साहित्यिक आपले साहित्य सादर करतात. कोरोना काळातील निर्बंधामुळे गेली ११ महिने या चांगल्या उपक्रमाला खंड पडला होता. मात्र, आता मासिक सभा घेत ही परंपरा पूर्ववत सुरू करण्यात आली.

अमर डागा यांनी केदारनाथ चव्हाण यांच्या तबलासाथीत आणि सुधीर देशमुख यांच्या टाळसाथीत बासरीवादन सादर केले. आपल्या बासरी वादनाची सुरवात त्यांनी राग मिश्र काफीने केली.त्यांच्या प्रसन्न करणाऱ्या सुरेल वादनाने प्रारंभीच श्रोत्यांची पकड घेतली आणि त्यानंतर मग गायकी अंगातील बासरी वादनाने त्यांनी विविध रागातील रसिकप्रिय गाणी बसरीवर सादर करीत श्रोत्यांच्या टाळ्या घेतल्या. कार्यक्रमात कोविड नियमांचे पालन करून श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कलावंतांसाठी मोफत सभागृह उपलब्ध
कला, संस्कृतीचा वारसा जोपासला जावा, यासाठी बीडमधील स्थानिक कलावंत, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू इच्छिणाऱ्यासाठी केएसके महाविद्यालयाचे अत्याधुनिक सभागृह मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. या सुविधेचा बीड शहरातील कलावंतांनी अधिकाधिक कार्यक्रम आयोजित करून लाभ घ्यावा, असे आवाहन नाट्य परिषदेच्या बीडच्या अध्यक्षा तथा प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!