बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा दुरुस्तीसह निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जाहीर केला. त्यानुसार बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी असलेल्या मतदारसंघामधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. २० मार्चला मतदान, तर २१ मार्चला निकाल जाहीर होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी कृषी पतपुरवठा व वि. का. सेवा, सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था यात बीड, शिरूर कासार, पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, धारूर, वडवणी, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, केज प्रत्येकी एक असे एकूण ११, राखीव प्रतिनिधी : महिला प्रतिनिधी २, अनु.जाती/जमाती प्रतिनिधी १, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी १, भटक्या विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिध १, इतर शेती संस्था, पणन/प्रक्रिया संस्था व नागरी सहकारी बँक/पतसंस्था १, कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्था १, नागरी सहकारी बँका, नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था १ असे एकूण १९ पदांसाठी निवडणूक होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दि. १५ ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दाखल करता येईल. दाखल उमेदवारी अर्ज यादी दि. १५ ते २२ फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध होईल. अर्जांची छाननी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था येथे होईल. उमेदवारी अर्ज सूची ही २४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २४ फेब्रुवारी २०२१ ते १० मार्च २०२१ अशी आहे. उमेदवारांना चिन्हांचे वाटप व अंतिम यादी प्रकाशन हे १२ मार्च २०२१ रोजी केले जाईल. मतदान २० मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी २१ मार्च रोजी सकाळी आठ वाजता सुरू होईल.
महत्वाच्या बातम्या
- आता नेत्यांचे नव्हे, तर ‘वाँटेड’ आरोपींचे झळकणार बॅनर!
- खाम नदीसाठी छावणीच्या सीईओंचा पुढाकार
- अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचा वाद : बहुजन समाजात फूट पाडण्याचे काम शरद पवार यांच्याकडून होत आहे?
- …म्हणून कर्णधार कोहलीने बुमराहला दुसऱ्या कसोटीत दिली नाही संधी
- वादानंतरही दख्खनचा राजा ज्योतिबा ‘या’ मालिकेकेने १०० भागांचा टप्पा गाठला; असे केले सेलिब्रेशन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
