मुंबई : सध्या बऱ्याच मालिका रसिक प्रेक्षकांचा मनावर राज्य करताना पहायला मिळतात पण त्यातल्या त्यात ‘ दख्खनचा राजा ज्योतिबा ‘ ह्या मालिकेची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते तसेच महत्वाचे म्हणजे ज्योतिबाच्या अवताराची गोष्ट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास मदत होते. या मालिकेचा चाहता वर्ग ही खूप मोठा आहे. तसेच मालिका आता महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे.
दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहेत. ही मालिका महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची निर्मिती आहे. या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा गाठला. या खास दिवसाचं सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने करण्यात आलं. कोल्हापूरमधील चेतना अपंगमती विकास संस्थेतील विकलांग मुलांसोबत मालिकेच्या टीमने १०० भागांच्या पूर्ततेचा आनंद साजरा केला.

या मालिकेत विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी विशालने 20 दिवसांत 12 किलो वजन वाढवले होते. विशाल हा स्वत: जिम ट्रेनर असून नुकताच अभिनयाकडे वळला आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून तो वर्कआऊट करतो. याआधी ‘साता जन्माच्या गाठी’या मालिकेत तर ‘मिथुन्’ आणि ‘धुमस’ या सिनेमात भूमिका साकारल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- लातुरात जिल्हा महाराष्ट्र केसरी साठी सज्ज; ४५ मल्ल निवड चाचणीला हजर
- खाम नदीसाठी छावणीच्या सीईओंचा पुढाकार
- अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचा वाद : बहुजन समाजात फूट पाडण्याचे काम शरद पवार यांच्याकडून होत आहे?
- …म्हणून कर्णधार कोहलीने बुमराहला दुसऱ्या कसोटीत दिली नाही संधी
- लोकसहभाग मोहिमेला सीईओ वगळता, आयुक्तांसह लोकप्रतिनिधिंची बगल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
