Share

लातुर जिल्हा महाराष्ट्र केसरी साठी सज्ज; ४५ मल्ल निवड चाचणीला हजर

Published On: 

लातूर : महाराष्ट्राच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी लातुर जिल्हा सज्ज झाला आहे. जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत ४५ मल्लांनी शड्डु ठोकत आपले कौशल्य पणाला लावले. या ४५ पुरुष मल्लांनी या निवड चाचणी स्पर्धेत सहभाग नोंदवीला. शुक्रवारी लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे ही जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली.

महाराष्ट्राची महत्वाची आणि अतिशय मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा लवकरच आयोजीत केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी लातुर जिल्हा सज्ज झाला आहे. कोरोना संसर्ग काळात मल्लांनी घरीच कसरत करुन आपली लय कायम ठेवली होती. पण या काळात जवळपास नऊ महिने स्पर्धा बंद होत्या. त्यामुळे अनेक खेळाडू हिरमुसले होते. पण महाराष्ट्र केसरीच्या निमीत्ताने लातुर जिल्ह्यात पुन्हा एकदा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी लातुरचा संघ निवडण्यासाठी शुक्रवारी जिल्हास्तरीय चाचणी घेण्यात आली होती. यावेळी खुल्या गटाच्या चाचणीत ४५ मल्लांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन हे राज्य कुस्तिगीर परिषदेचे उपाध्यक्ष नागनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र केसरी स्पर्धा केवळ खुल्या गटातच होणार आहे. इतर वयोगटाच्या स्पर्धेचा कार्यक्रम आजुन जाहिर झाला नाही. आण्णासाहेब मुळे, विठ्ठल सूर्यवंशी, देशमुख, रंगनाथ अंबुलगे आदींनी यावेळी पंच म्हणुन काम पाहिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!