Share

रोहित शर्माच्या परफेक्ट कव्हर ड्राइव्हने विराट प्रभावित, बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पहिला कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे.

तत्पुर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली असून भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, संघाची सुरुवात काहीशी चांगली झाली नाही. सामन्याच्या आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लड फिरकीपटू ओली स्टोनने शुभमन गिलला माघारी धाडलं.

संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसल्याने मैदानावर असलेल्या रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारावर दबाव वाढणार असे दिसत होते मात्र. ‘हिटमॅन’ने कोणतेही प्रेशर न घेतला आक्रमक फलंदाजी केली.

यादरम्यान, ‘हिटमॅन’ रोहितने एक शानदार कव्हर ड्राइव्ह शॉट खेळला ज्याने स्टेडियमवर उपस्थतीत प्रेक्षकच नाही तर स्वतः कर्णधार कोहलीलाही सुपर इम्प्रेस केलं. बीसीसीआयने (BCCI) पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहितच्या या शानदार शॉटनंतर विराट आपल्या सहकारी खेळाडूसाठी टाळ्या वाजवताना दिसला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!