Share

सातारा-देवळाई विकासाला मिळणार हिरवा कंदिल; नगरविकास मंत्र्यांची आज बैठक

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सातारा-देवळाई आणि शहरातील गुंठेवारी भागातील ड्रेनेजलाइनच्या कामासाठी महापालिका प्रशासन राज्य सरकारकडे निधीची मागणी करणार आहे. सातारा-देवळाई भागात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी २०० कोटी आणि गुंठेवारीच्या राहीलेल्या भागात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी १७५ कोटींच्या कामाचे नियोजन पालिकेने केले आहे. शनिवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शहरात आहेत. यावेळी या निधीची मागणी केली जाणार असे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी शहराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी आणि विकास कामांसंदर्भात आढावा बैठक होणार आहे. नगरविकास मंत्र्यांकडे पालिकेचा सेवाभरती नियम व आकृतीबंधाला मंजूरी देण्यात यावी, अशी मागणी केली जाणार आहे. त्यासोबतच पालिकेत नव्याने समावेश झालेल्या सातारा-देवळाई भागातील नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने रस्त्यांची कामे आणि ड्रेनेजलाइन टाकावी लागणार आहे.

या भागातील रस्त्यांसाठी शासनाने आधीच ५० कोटींचा निधी दिला असून त्यातील बहुतांश रस्त्यांची कामे सुरू झाली आहे. आता या भागात ड्रेनेजलाइन टाकण्याचा डीपीआर तयार असून सरकारकडे मंजूरीसाठी पाठवलेला आहे. ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी २०० कोटी रूपयाच्या निधीची आवश्यकता असल्यामुळे हा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी केली जाणार आहे. सातारा-देवळाईसह गुंठेवारी भागात ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी ३७५ कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!