🕒 1 min read
लातूर : एकीकडे शासनासह सर्वच राजकीय पक्षांचे कार्यक्रम सभा-संमेलन घेत आहेत. त्या सभांना गर्दी होते. मात्र शिवजयंतीला होणारी गर्दी शासनाने कोरोना संसर्गाचे कारण दाखवत नियमावली जाहीर केली आहे. पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करणार आहोत. त्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही असा निर्धार छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी शुक्रवारी लातूर येथे केला आहे.
शासनाने शिवजंयती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. पण एकीकडे शासन आणि राजकीय पक्ष मेळावे, सभा घेत आहेत. यात कोणतेच निर्बंध पाळले जात नाही. तसेही कोरोना संसर्ग आता ओसरला आहे. तेव्हा शिवजयंतीसाठी कोरोनाचे कारण देऊन नियमावली जाहीर करणे अंत्यत चुकीचे आहे. याला आमचा विरोध आहे, असे म्हणुन शिवप्रेमी नागरिक, कार्यकर्ते १९ फेब्रुवारी रोजी शिवजंयती थाटमाटात आणि जल्लोषात साजरी करु असे नानासाहेब जावळे-पाटील यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवरायांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्रात शिवजंयती साजरी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, हे दुर्दैव आहे. शिवरायांचे सरकार हे सर्वाना सोबत घेऊन चालणारे होते. शिवरायांचे विचार आजही शिवप्रेमींच्या मनामध्ये रुजलेले आहेत. असेही नानासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, मराठा सेवा संघ आणि मराठा महासंघाचे पदाधिकाऱ्यासंह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- वसीम जाफर वादावर अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया
- हिंगोलीतील असोलवाडीत कुक्कुटपालन केंद्रातील ३०० कोंबड्या दगावल्या
- नोकरी बदलण्यात महिन्याचे अंतर असल्यास पीएफवरील करावर होणार परिणाम
- वाढता वाढता वाढे …श्री राम जन्मभूमी ट्रस्टकडे तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी झाला जमा
- बॉलिवूडचा शहेनशहा शरद पवारांना भेटण्यासाठी थेट बारामतीत?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
