Share

वसीम जाफर वादावर अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया

Published On: 

चेन्नई : भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी नुकतेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंडमध्ये झालेल्या झालेल्या वादानंतर वासिम जाफर यांनी हे पाऊल उचलले. वसीम जाफर यांच्यावर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. वासिम जाफर यांनी बुधवारी त्यांच्यावरील हा आरोप फेटाळून लगावले. याबाबत वसीम जाफरचा माजी सहकारी आणि टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला विचारण्यात आलं, पण याबाबत रहाणेने प्रतिक्रिया देणं टाळलं.

‘मला या प्रकरणाबाबत काहीही माहिती नाही. नक्की काय झालं आहे, याची कल्पना नसताना मी या विषयावर बोलणार नाही,’ असं अजिंक्य रहाणे म्हणाला आहे. जाफर आणि अजिंक्य रहाणे मुंबईकडून, वेस्ट झोन आणि इंडियन ऑईल कॉरपोरेशनकडून क्रिकेट खेळले आहेत. दुसरीकडे अनिल कुंबळे, इरफान पठाण, मनोज तिवारी आणि मुंबईचे माजी क्रिकेटपटू शिशीर हट्टंगडी यांनी वसीम जाफरला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, माहिम वर्मा यांनी मीडियाच्या माध्यमातून, मी मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे, असे वासिम जाफर यांनी सांगितले.“संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे” असे वासिम जाफर पत्रकार परिषदेत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!