🕒 1 min read
नवी दिल्ली : ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला होता.
राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे. या राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास देखील सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणार खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत संकलित केला जात आहे.राम मंदिरासाठी देणगी देणाऱ्या प्रत्येकाला संबंधित पैशांची पावती दिली जात आहे.
Even a small contribution with pure heart for our Prabhu is valuable.
We urge all Rambhakts to come forward & contribute for the construction of a Bhavya & Divya Shri Ram Janmbhoomi Mandir in Ayodhya.
Let's join hands for Shri #RamMandirNidhiSamarpan Abhiyan.
Jai Shri Ram! pic.twitter.com/tNZqjwntAA
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 22, 2021
विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे.या प्रकल्पासाठी आतापर्यंत देणग्यांच्या स्वरुपात १ हजार ५११ कोटी रुपयांचा निधी उभा राहिला आहे.
Rs 1,511-crore has been collected for Ram Temple construction in Ayodhya, as per data available on Thursday evening: Swami Govind Dev Giri, Treasurer of Shri Ram Janmabhoomi Tirtha Kshetra (12.02.2021) pic.twitter.com/OYQG5MJBKu
— ANI (@ANI) February 13, 2021
अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी संपूर्ण देशभरातून निधी गोळा करण्यात येत आहे. या देणगी मोहिमेदरम्यान देशभरातील ४ लाख गावे आणि ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोहचण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्ही ही मोहिम १५ जानेवारीपासून सुरु केली असून ती २७ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. ४९२ वर्षानंतर लोकांना धर्मासाठी काही करण्याची संधी मिळाली आहे, असे गोविंद देव गिरी यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- भारत आणि इंग्लंड संघात आज होणार काट्याची टक्कर ; भारतीय संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात
- ‘भाजपने काव काव करायचे आणि राजपालांनी त्यांना चहापानास बोलवायचे ही कोणती घटनात्मक संस्कृती ?’
- समांतर च्या ठेकेदाराचा कोर्टात जाण्याचा इशारा; प्रकरण शासनाकडे सोपावणार मनपाचा निर्णय
- पुन्हा स्टेडिअमवर कलकलाट ! प्रेक्षकांच्या आगमनासाठी बीसीसीआय आतुर, शेअर केला व्हिडिओ
- कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, पण….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
