Share

“जालना हा शिवसेनेचा बालेकिल्ला; खोतकरांनी केलेल्या विकासाच्या मागण्या पूर्ण करू”

Published On: 

🕒 1 min read

जालना : जालना जिल्हा हा पुर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जालन्यातील जनतेने भरभरून प्रेम केले, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. ते जालना येथे माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्या निवसस्थानी पार पडलेल्या बैठकीत बोलत होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, अर्जुन खोतकर यांनी शहरातील विकासकामात नेहमी पुढाकार घेतला. शहरातील मोती तलाव असो की त्याचे सुशोभीकरण, चौपाटीचा विकास, भुयारी गटार, पीआर कार्ड आणि महात्मा फुले मार्केट उभारणीसह शहर आणि जिल्ह्यातील विकासकामे खोतकर यांनी केले आहेत. त्यांच्या विकासकामांच्या मागण्या पूर्ण करण्यास कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अर्जून खोतकरांच्या निवासस्थानी बैठक
जालना दौऱ्यावर आलेल्या नगरविकास मंत्री एकनात शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्या भाग्यनगर येथील निवासस्थानी व्यापारी, उद्योजक, नगरसेवक पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. अंबादास दानवे, उत्तमराव वानखेडे, जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे, शिवाजी चौथे, संतोष सांबरे, लक्ष्मण वडले, जयप्रकाश चव्हाण, युवा सेना राज्यविस्तारक अभिमन्यू खोतकर यांची उपस्थिती होती.

ठाकरे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार – शिंदे
यावेळी बोलनाता एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार सत्तेचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी काम करत आहे. सामान्य माणसाला परवडेल अशा कमी किमतीत घर मिळावे असा महत्त्वाकांक्षी निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. कोविडमुळे आर्थिक मंदी असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी-विक्री झाली. कोरोना महामारीमुळे राज्य आर्थिक संकटात असतानाही चक्रीवादळ, गारपीट अशा संकट प्रसंगी मदत दिली. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, असे यावेळी शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!