🕒 1 min read
मुंबई: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच चर्चेत आणि वादात सापडलेले असतात. त्यांनी पदभार स्वीकारल्या पासून ते वादात आहेत. यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा असो की, सरकारचा एखादा निर्णय त्याचबरोबर महाआघाडी सरकार आणि भाजप मधील टीका टिप्पणी मध्ये देखील कोशारी यांचा समावेश असतोच यावरून आजच्या सामना अग्रलेखातून राज्यापालांवर टीका करण्यात आली आहे.
संघाच्या विचारसरणीचे असलेले कोशारी आणि महाआघाडी सरकार हे समीकरणच वेळोवेळी राजभवन आणि सरकार यांच्या वादात नेहमीच अधोरेखित होते. नुकताच राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं होत. आश्चर्य म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली होती. राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार यांच्यातील हा वाद पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय ठरला आहे.
‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. श्री. कोश्यारी हे अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत. विधिमंडळ तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्यांनी काम केले. केंद्रात मंत्री झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले तरी ते इतके चर्चेत कधीच आले नव्हते. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आल्यापासून हा साधा माणूस या ना त्या कारणाने चर्चेत पिंवा वादात राहिला आहे. वाद निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही व राज्यपालांनी तर शहाण्यासारखे वागावे असे संकेत असतानाही महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत, हा प्रश्नच आहे. अशी टीका शिवसेनेकडून आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- उद्या लोकसभेत महत्त्वाची विधेयके पास होण्याची शक्यता, भाजपचा खासदारांना व्हीप जारी
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- पुन्हा स्टेडिअमवर कलकलाट ! प्रेक्षकांच्या आगमनासाठी बीसीसीआय आतुर, शेअर केला व्हिडिओ
- “शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतान ची साजरी करणार का?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
