🕒 1 min read
औरंगाबाद : धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा वार्षिक योजनेच्या २१० कोटी रुपये खर्चाचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
पालकमंत्री सत्तार नुकतेच धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथे तापी नदीवरील पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सत्तार म्हणाले, ‘धुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत यासंदर्भातील निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. या जिल्ह्यातील दळण- वळणाच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करण्यात येईल.
धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात एमआरआय मशीन कार्यान्वित करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे’. यावेळी संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. पंकज गोरे, सरपंच गिरीश देसले आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- केंद्र सरकारच्या दबावानंतर ट्विटरने 97 टक्के अकाउंट केले ब्लॉक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
