Share

गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे; राणेंची गंभीर टीका

Published On: 

🕒 1 min read

पुणे : परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. महंमदवाडीतील ए वन पार्क या उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. पूजा चव्हाण ही रविवारी सोसायटीत आपल्या घरात होती. यावेळी सोबत तिचे दोन मित्रही होते. मध्यरात्रीच्या सुमारास तिने अचानक तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, या तरुणीने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव या प्रकरणात जोडलं जात आहे. विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातूनच तीने आपले जीवन संपवल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी देखील महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली आहे. ‘पुण्यातील तरुणीच्या मृत्यूमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. तुरुंग पर्यटन या सरकारने सुरू केलं आहे कुठेतरी वाचण्यात आलं पण जर एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!