🕒 1 min read
मुंबई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
त्यातच आता श्रीसंत याने आयपीएलमधील लिलावासाठी नोंदणी केली आहे. 2013 साली आयपीएलमध्ये बेटिंगप्रकरणी श्रीसंतवर सात वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये लिलावासाठी नोंदणी केली होती. पण आयपीएल खेळण्याचं श्रीसंतचं स्वप्न भंगलं आहे. आयपीएल संचालन परिषदेने खेळाडूंची संख्या कमी केल्यामुळे आता फक्त 292 खेळाडूंवर बोली लावली जाईल. लिलावाच्या या यादीमध्ये 164 भारतीय, 125 परदेशी आणि असोसिएट देशांचे खेळाडू आहेत.
श्रीसंतचा या यादीमध्ये समावेश झाला नसला, तरी तो केरळकडून सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळला होता. आयपीएल 2021 च्या लिलावासाठी श्रीसंतने त्याची बेस प्राईज 75 लाख रुपये ठेवली होती. श्रीसंतशिवाय भारतीय टेस्ट टीमचा आधार चेतेश्वर पुजाराचं नावही या यादीत नाही.
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्या आधी राजमाता अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करत पडळकरांकडून घणाघात
- मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप; अनिल कुंबळे, इरफान पठाणसह भारतीय क्रिकेटपटूंचा पाठिंबा
- जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत दाखल
- भारताला मोठा दिलासा, तर इंग्लंडला बसणार मोठा धक्का
- शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्यासाठी अर्जून खोतकर यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
