Share

भारताला मोठा दिलासा, तर इंग्लंडला बसणार मोठा धक्का

Published On: 

चेन्नई : भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरी कसोटी  शनिवारपासून सुरू होईल. या कसोटीच्या आधीच एक मोठी बातमी येत आहे. भारताला दिलासा देणारी तर पाहुण्या संघाला धक्का देणारी ही बातमी आहे. अष्टपैलू अक्षर पटेलला दुखापत झाल्यामुळे त्याला अंतिम अकराच्या संघात खेळता आले नाही. आता मात्र अक्षर फिट असल्याने त्याचं संघात पुनरागमन होऊ शकतं. असं झालं तर नदीम आणि राहुल चहर या दोघांना पुन्हा राखीव खेळाडू म्हणून बसवावं लागेल.

दुसरी बातमी इंग्लंड संघातून आलेली आहे. त्यांच्या संघाला धक्का देणारी ही बातमी आहे. इंग्लंडचा आक्रमणाची धार या धक्क्याने कमी होऊ शकते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव करण्यात इंग्लिश गोलंदाजांचा मोठा वाटा होता. आता या ब्रिटीश फौजेतला नामी वीरच पुढच्या कसोटीसाठी नसणार आहे.

इंग्लंडचा मुख्य आधार असलेला खेळाडूच आता पुढची कसोटी खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. जोफ्रा आर्चर आता 13 तारखेपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. जोफ्रा आर्चरच्या उजव्या कोपराला इंजेक्शन दिल्यामुळे ते सुजलं आहे. या दुखापतीमुळे तो शनिवारपासून सुरू होणारा सामना खेळू शकणार नाही.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!