Share

मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप; अनिल कुंबळे, इरफान पठाणसह भारतीय क्रिकेटपटूंचा पाठिंबा

Published On: 

🕒 1 min read

उत्तराखंड : भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी नुकतेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंडमध्ये झालेल्या झालेल्या वादानंतर वासिम जाफर यांनी हे पाऊल उचलले. वसीम जाफर यांच्यावर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. वासिम जाफर यांनी बुधवारी त्यांच्यावरील हा आरोप फेटाळून लावला आहे.

माहिम वर्मा यांनी मीडियाच्या माध्यमातून, मी मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे, असे वासिम जाफर यांनी सांगितले.“संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे” असे वासिम जाफर पत्रकार परिषदेत म्हणाले.

दरम्यान, क्रिकेट संघटनेच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणाऱ्या भारताचे रणजी हिरो वसिम जाफर यांना भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण  आणि मनोज तिवारी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

अनिल कुंबळे ट्विट करून म्हणाले, ”तुला हे सारे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे, हेच दुर्दैवी आहे,” असे पठाणनेही वसीम यांच्या समर्थानात ट्विट करत म्हटले. दरम्यान, अनिल कुंबळे आणि वसिम जाफर हे दोघेही एकत्र खेळण्याशिवाय सध्या किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये सहकारी आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वातील पंजाब संघाचे दिग्गज फिरकीपटू मुख्य प्रशिक्षक असून, जाफर फलंदाजी प्रशिक्षक आहेत.

”मी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन करणार आहे,” असे तिवारीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!