🕒 1 min read
मुंबई : भारत हा कृषिप्रधान देश असल्याचं बोललं जातं. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कित्येक दिग्गज नेत्यांना आंदोलने करावे लागले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतःवर गुन्हे देखील या नेत्यांनी घेतले. आज ही शेतकरी केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. अशाच शेतकरी चळवळीतील दोन नेत्यांची पक्ष बाजूला ठेवून भेट झाली.
हे दोन नेते म्हणजे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि आमदार देवेंद्र भुयार. सदाभाऊ देखील राजू शेट्टी यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत होते. या नेत्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने देखील केली. मात्र, काही मतभेदांमुळे सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानाची साथ सोडली आणि रयत क्रांती संघटनेची स्थापना करून भाजपसोबत राहणं पसंत केलं.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांची देवेंद्र भुयार यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आठवणी जागवतानाच त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं आहे. नेत्याच्या अहंकारामुळेच चळवळीचा घात झाला, असं म्हणत त्यांनी राजू शेट्टींवर आगपाखड केली आहे. दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार हे देखील नाराज झाल्याचं बोललं जात आहे. अशातच त्यांनी विविध नेत्यांच्या घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सदाभाऊ खोत यांची फेसबुक पोस्ट –
नेत्याच्या अहंकारामुळे चळवळीचा घात…
शेतकरी संघटनेतील माझे जुने सहकारी आणि धडाडीचा कार्यकर्ता जो २०१९ च्या निवडणुकीमध्ये आमदार झाला असे आमदार देवेंद्र भुयार यांची आज अचानक आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये भेट झाली. संघटनेतील अनेक जुन्या आठवणींना केलेल्या आंदोलनांच्या आठवणीला उजाळा मिळाला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आम्ही दीर्घकाळ चर्चा देखील केली.
परंतु चळवळीचा पिंड असलेला एक सच्चा कार्यकर्ता आ. देवेंद्र भुयार यांच्या छातीवरचा बिल्ला नसलेला पाहून मनाला थोड्याश्या वेदना झाल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतत धडपडणाऱ्या आणि त्यासाठी सतत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याच्या छातीवरील लाल बिल्ला जेव्हा नेतृत्वाच्या अहंकारामुळे बाजूला जातो हे पाहुन प्रचंड दुःख झालं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी केलेली चळवळ नेतृत्वाच्या हट्टापाई पालापाचोळ्यासारखी झालेली पाहुन आज मन खिन्न झालं.
मी देवेंद्र भुयार यांना बोललो, आपण संघर्षातून वरती आलोय. तू काय मी काय संघर्ष तर आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायम लढत राहा. शेतकऱ्यांची नाळ सोडू नको. शेतकऱ्यांचे प्रश्न कायम सभाग्रहात तितक्याच पोटतिडकीने मांडत जा, जितक्या पोटतिडकीने आपण रस्त्यावर आंदोलन करत होतो.
https://www.facebook.com/SADABHAUKHOT1/posts/262462925245554
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर केवळ राज्यपालांना विमान नाकारणं अहंकार कसा होऊ शकतो’
- ईव्हीएम वरून अजितदादा आणि नाना पटोलेंमध्ये मतभेद; खुद्द पटोलेंनी दिली कबुली
- शिवजयंतीवरील निर्बंधांचं उदयनराजेंनी केलं समर्थन !
- शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारचे निर्बंध ! वाचा कशी आहे नियमावली
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
