मुंबई : काही निवडणुकीतील पराभव पाहून कॉंग्रेस सह अनेक पक्ष इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनला विरोध करत आलेले आहेत.या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय/सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कायदा महाराष्ट्र विधानमंडळाने तयार करावा अशा स्पष्ट सुचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पदावर असताना दिल्या होत्या. मात्र आता पुन्हा या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्येच मतभेद दिसून येत आहेत.
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. ‘ईव्हीएम मतांची अचूक संख्या दाखवते हे आपल्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारे मी सांगू शकतो,’ असे महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सांगितले. ‘बऱ्याचदा विविध पक्षाचे कार्यकर्ते काय करतात? चांगलं बहुमत मिळालं तर सर्व काही ठीक आहे आणि जर खूप जास्त मतांच्या फरकाने पराभव झाला, डिपॉझिट जप्त झालं तर म्हणातात ईव्हीएम मॅनेज केलं आहे. मात्र असं काही नाही ईव्हीएम ठीक सुरू आहे, पेपरलेस काम होतं. माझा तरी ईव्हीएमवर संपूर्ण विश्वास आहे.’ असं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना आपला आक्रमक बाणा दाखवला आहे. तर, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवारांना देखील अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचं दिसून आलं. ईव्हीएमबाबत अजित पवार यांचे वेगळे मत आणि माझे मत वेगळे. मला ईव्हीएम नको मी तसं मत व्यक्त केले. अजित पवार वित्त मंत्री आहेत. चावी त्यांच्याकडे म्हणून सर्वच ऐकायचं असं कुठे आहे? असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- छत्रपतींच्या महाराष्ट्रातच शिवजयंतीवर निर्बंध यावेत, याहून दुर्दैव नाही ! भाजपची राज्य सरकारवर टीका
- पवार साहेब आरक्षणाबाबत लक्ष घाला, अन्यथा उद्रेक होईल : उदयनराजे भोसले
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारचे निर्बंध ! वाचा कशी आहे नियमावली
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
