🕒 1 min read
नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. उदयनराजे-पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर उदयनराजे भोसले हे पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट पार पडली आहे.
या भेटीनंतर उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाच्या प्रश्नांवरून ही भेट झाल्याचे त्यांनी सांगितलं. तर, राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. कोरोनाआटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर देखील उदयनराजेंनी भाष्य केलं आहे.
शिवजयंती राज्याची अस्मिता असली तरीही या कोरोनाच्या काळात उत्सव साजरा करताना संसर्गाचा धोका संभवतो. त्यामुळे या जीवाला असलेला धोका लक्षात घेतला पाहिजे, असं म्हणत उदयनराजेंनी शिवजयंतीवरील निर्बंधांचं समर्थन केलं आहे.
जाणून घ्या कशी आहे नियमावली –
- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोरोनामुळे यंदा साधेपणानं साजरी करावी.
- गड – किल्ल्यांवर जाऊन जयंती साजरी न करता घरी बसूनच हा उत्सव साजरा करावा.
- सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये.
- प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी; महारांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन बंधनकारक असेल.
- 10 व्यक्तींच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करावी जयंती; आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास मत्र परवानगी असेल. पण, तिथंही नियमांचं पालन बंधकारक असेल.
- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनानं या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांनाही तसं आवाहन करावं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर केवळ राज्यपालांना विमान नाकारणं अहंकार कसा होऊ शकतो’
- ईव्हीएम वरून अजितदादा आणि नाना पटोलेंमध्ये मतभेद; खुद्द पटोलेंनी दिली कबुली
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारचे निर्बंध ! वाचा कशी आहे नियमावली
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
