🕒 1 min read
नवी दिल्ली : राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली आहे.
राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधी दरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा आता रखडलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन असो, हा वाद वाढतच आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र, राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.
राज्यपाल पदावरील व्यक्तीला परवानगी नाकारल्याने भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी देखील ठाकरे सरकारवर शरसंधान साधलंय. हे अहंकारी सरकार असल्याचा घणाघात फडणवीसांनी केला आहे.
दरम्यान, यावर शिवसेनेचे नेते दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांची खिल्ली उडवली आहे.
‘अरे बापरे.. अहंकार हा शब्द कोण कोणाला उद्देशून म्हणतंय. या संपूर्ण प्रकरणात अहंकाराचा प्रश्न येत नाही. कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र सरकार ज्याप्रकारे वागतंय ते नियमात बसत असेल, तर केवळ राज्यपालांना विमान नाकारणं, हे अहंकार कसा होऊ शकतो’, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ई-रिक्षा चालवणारी कोण आहे ‘हि’ अभिनेत्री ?
- गावकऱ्यांच्या मागणीची सोनू कडून दखल; पकडून दिले वानर…
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- राज्यपालांना विमान नाकारलं, अजित पवार म्हणतात…
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
