Share

लोकोपयोगी कामांसाठी उदयनराजेंची धडपड; केंद्रीय मंत्र्यांच्या भेटींचा लावला धडाका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- भाजपचे खासदार उदयनराजे भोसले नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. भोसले हे सध्या दिल्लीत असून त्यांनी आता लोकोपयोगी कामे पूर्ण करण्यासाठी विविध मंत्र्यांच्या भेटींचा धडाका लावला आहे. अनेक लोकोपयोगी कामांसाठी उदयनराजे भोसले हे धडपड करत असल्याचे पाहून साताऱ्यातील जनतेला आनंद होत असल्याचे चित्र आहे.

शेंद्रे ते कागल रस्त्याच्या सहा पदरीकरण कामाच्या संदर्भात गडकरींची भेट
अनेक वर्षांपासून रखडलेल्या शेंद्रे ते कागल रस्त्याच्या सहा पदरीकरण कामाची प्रक्रिया तात्काळ सुरू करून ‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा’ या तत्वावर काम सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या. काल केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची काल खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील रस्ते विकासाच्या कामांच्या मागणीचे निवेदन गडकरी यांना दिले. त्यानंतर गडकरी यांनी शेंद्रे-कागल महामार्गाच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निविदा काढण्याच्या सूचनाही दिल्या.

जिहे-कटापूर योजना
माण खटाव तालुक्याच्या विकासात भर घालणाऱ्या माननीय गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार अर्थात जिहे-कटापूर या महत्त्वकांक्षी योजनेस केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नुकतेच ५३७ कोटी रुपये दिले असून यापुढे ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी जलशक्ति मंत्रालयाकडून आवश्यक तो निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी खा.भोसले याना दिले. दिल्ली येथील शेखावत यांच्या निवासस्थानी भेट घेवून भोसले यांनी मागणीचे हे निवेदन दिले.

जिहे-कटापूर या योजनेमुळे २७५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून या योजनेमुळे माण खटाव तालुक्यातील ६७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. या योजनेमुळे या ६७ गावांमधील सुमारे २७५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून या परिसरातील दुष्काळ निवारणास उपयुक्त ठरणार आहे. याआधी महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्पासाठी केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र काही प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्रातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी भोसले यांचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रतापगड आणि अजिंक्यतारा राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे मागणी.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने स्वराज्याची निर्मीती केली. हाच ऐतिहासिक ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. विशेषत: किल्ले अजिंक्यतारा आणि प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून केंद्र सरकारने या किल्यांचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून त्यांचे संवर्धन करावे. अशी मागणी नुकतीच भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली.

याआधी आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचा खंदा प्रशंसक आहे. तसेच देवी भवानीचा उपासक असल्याचे सांगून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रति आदर व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर भोसले यांनी व्यंकय्या नायडू यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेवून हि मागणी केली.

सातारा जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रकल्पांबाबत व मागण्यांबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा
सातारा जिल्ह्यासह प.महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे रेल्वेचे विविध प्रकल्प साताऱ्यात आणण्याबाबतचे निवेदन खा. भोसले यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना दिले आहे तसेच रेल्वेच्या विविध प्रश्नावर गोयल यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी गोयल यांनी साताऱ्यासाठी जास्तीत जास्त रेल्वेचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

प्रशासकिय मंजूरी मिळालेला सुमारे ३००० कोटी रूपये खर्चाच्या कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. पर्यटनदृष्ट्या महत्वाचे असलेले सातारा रेल्वे स्टेशनचे नुतणीकरण आणि सौंदर्यीकरण तात्काळ करावे. जेणेकरून जिल्ह्यातील पर्यटनासाठी पर्यटक आकर्षित होतील. सातारा जिल्ह्यातील महागाव येथे रेल्वे खात्याची ५० एकर मोकळी जमीन उपलब्ध असून या जमीनीवर रेल्वेचा स्वत:चा सौरउर्जा प्रकल्प उभा करावा. जेणेकरून निर्माण झालेली वीज रेल्वेच्याच वापरात येईल. या महत्वाच्या मागणींसह रेल्वेचे विविध प्रकल्प जिल्ह्यात आणण्याबाबत गोयल यांच्याशी उदयनराजे यांनी चर्चा केली.

प्रस्तावित शासकीय मेडिकल कॉलेज संदर्भात हर्षवर्धन यांची भेट
नुकतीच भोसले यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांची भेट घेतली व सातारा येथील प्रस्तावित शासकीय मेडिकल कॉलेज संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. सातारा शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रक्रियेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहभाग घ्यावा व कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त वाढीव जागांना आपणाकडून परवानगी मिळावी या संदर्भात मागणी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!