🕒 1 min read
मुंबई : खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सुरु केलेल्या कारवाईविरोधातील याचिका बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं अखेर मागे घेतली आहे.
यावरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगना आणि भाजपवर निशाणा साधत ट्विट केले आहे कि, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना समर्थक आणि महाराष्ट्र द्रोही भाजपा नेत्यांनी आता महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. पुढे ट्विटमध्ये म्हणाले, ‘भाजपाच्या “झांसे की रानी” चे पितळ उघडे पडले! महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या भाजपा नेत्यांनी बेकायदा बांधकामाला ही पाठिंबा दिला. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना समर्थक आणि महाराष्ट्र द्रोही भाजपा नेत्यांनी आता महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे.’
भाजपाच्या "झांसे की रानी" चे पितळ उघडे पडले!
महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या भाजपा नेत्यांनी बेकायदा बांधकामाला ही पाठिंबा दिला. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना समर्थक आणि महाराष्ट्र द्रोही भाजपा नेत्यांनी आता महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. pic.twitter.com/IIozi7SML7— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 11, 2021
खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केले आहेत. मात्र, घरात हा बदल करताना इमारतीच्या प्लानमधील मुख्य स्ट्रक्चरमध्ये बदल केल्याचं पालिकचं म्हणणं आहे. यासंबंधी पालिकेनं कंगनाला नोटीस बजावली होती.
या नोटिशीविरोधात तिनं हायकोर्टात धाव घेतली होती.मात्र आता आपण बीएमसीविरोधातील खटला मागे घेत असून, नागरी संस्थेशी बोलून हे बेकायदा बांधकाम प्रकरण सोडवले जाईल, असं आज कंगनानं स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेकडे बांधकाम नियमित करून घेण्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती मुंबई हायकोर्टात कंगनाने वकिलांमार्फत दिली आहे. आता कंगना सदर बांधकाम नियमित करून घेण्याची विनंती कंगना BMC कडे करणार आहे.
यावर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी कंगनाला ही मुभा देत, कंगनाने अर्ज केल्यास पालिकेने त्या तारखेपासून चार आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा आणि निर्णय विरोधात असल्यास पालिकेने त्या अनुषंगाने कार्यवाही दोन आठवड्यांपर्यंत करू नये, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- विजय हजारे ट्रॉफीसाठी संघाची घोषणा ; श्रेयस अय्यर मुंबईच्या कर्णधारपदी
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- टीम इंडियाला मोठा झटका, इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी रविंद्र जडेजा तंदुरुस्त नाही
- जालन्यातील सिडकोचे प्रकल्प रद्द करू नये; आमदार अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘सध्या ‘सब घोडे बारा टके’ भावाने प्रत्येकावर देशद्रोहाचीच कलमे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
