Share

‘सध्या ‘सब घोडे बारा टके’ भावाने प्रत्येकावर देशद्रोहाचीच कलमे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: प्रजसत्ताक दिनी शेतकरी आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसाचारामध्ये एका आंदोलकाचा ट्रैक्टर उलटल्याने मृत्यू झाला. मात्र काही मंडळींनी या घटनेची सत्यता न तपासता सोशल मिडीयावर बेजबाबदार पोस्ट केल्या असल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये शशि थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई, मृणाल पांडे, जफर आगा, परेश नाथ, अनंत नाथ,विनोद के जोस यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

दरम्यान, यासर्व मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने यासर्वांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. CJI एसए बोबडे, जस्टिस एएस बोपन्ना आणि जस्टिस वी रामासुब्रमण्यन यांच्या समोर हि सुनावणी झाली. न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्याने या सर्वाना मोठा दिलासा मिळाला आहे. यावरून शिवसेनेकडून आज सरकारवर त्याचबरोबर पत्रकारांवर देखी टीका करण्यात आली आहे. सध्या सर्वांवरच देशद्रोहाची कलमे लावली जात असल्यावरून सरकारवर निशाणा साधाण्यात आला आहे.

‘मृत शेतकऱ्याच्या शोकसभेला उत्तर प्रदेशमधील रामपूर या गावी दोन दिवसांपूर्वी प्रियंका गांधी उपस्थित राहिल्या. या भयंकर अपराधाबद्दल श्रीमती प्रियंका गांधींनाही देशद्रोहाच्या खटल्यातील आरोपी करणार काय? हे जे कोणी श्रेष्ठ ज्येष्ठ पत्रकार आज सर्वोच्च न्यायालयाच्या चकरा मारीत आहेत, त्यांच्या अतिरेकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे फटके शिवसेनेनेही खाल्लेच आहेत. निखिल वागळे यांच्या अतिरेकी कलमबाजीबद्दल संतापलेल्या शिवसैनिकांनी वागळ्यांवर हल्ला केला असे सांगतात. त्यावेळी आज देशद्रोही ठरलेले हेच बहुतेक पत्रकार शिवसेना भवनाच्या दारात ‘मांडव’ घालून तांडव करीत होते, शिवसेनेच्या नावाने शंख करीत होते. तरीही आम्ही म्हणतो ते देशद्रोही नाहीत व त्यांचा असा छळ करणे योग्य नाही. सध्या मात्र ‘सब घोडे बारा टके’ भावाने ऊठसूट प्रत्येकावर देशद्रोहाचीच कलमे लावली जात आहेत. यावरून खासदार संजय राऊत यांची कडून केंद्र सरकावर टीका करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!