Share

मोठी बातमी : भारत-चीन सीमेवरील तणाव निवळला; दोन्ही देशांचे सैन्य मागे हटलं

Published On: 

नवी दिल्ली : भारतावर कुरघोडी करणं ही चिनी ड्रॅगनची जुनीच सवय आहे. गेल्या वर्षभरापासून भारत आणि चीन मध्ये संघर्ष वाढला होता. कोरोना काळात देखील चीनने भारतीय भूभागात घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. यावेळी दोन्ही देशाचे सैन्य एकमेकाला भिडलं देखील होतं. यात भारताचे २० जवान शहिद झाले होते. तर, याहून दुप्पट चिनी सैनिकांना भारतीय फौजेने यमसदनी धाडलं होतं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताने चीनचा बुरखा फाडला होता. मात्र, तरीदेखील पँगॉग लेक भागात चीनने सैन्य वाढवण्यास सुरुवात केली होती. चीन ला कायमचा धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. तर, भारताला स्वयंसिद्ध बनवण्यासाठी आत्मनिर्भर भारताची घोषणा करण्यात आली होती.

या काळात दोन्ही देशाच्या सैन्यांमध्ये तब्बल आठ चर्चेचा फेऱ्या झाल्या. तर, नवव्या फेरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सैन्य मागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यानुसार भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या सैन्याने देखील याबाबत घोषणा केली आहे.

तर दुसरीकडे भारतीय सैन्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार पँगाँग त्सोसह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या काही परिसरातून सैनिकांना मागे घेण्याबाबत सहमती झाली आणि त्यानंतर सैन्य मागे घेण्याचं कार्य सुरु करण्यात आलं. याबाबत भारतीय सैन्याने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, चीनच्या संरक्षण विभागाने चीन आणि भारताच्या फ्रंट लाईनवरील सैनिकांनी उत्तर आणि दक्षिण पँगाँग त्सो तलावावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या नवव्या फेरीत सहमती झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!