नवी दिल्ली : देश कोरोनातून सावरत असला तरी सद्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढत आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. ७७ दिवस उलटून देखील शेतकरी व केंद्र सरकार यांच्यातील कोंडी कायम आहे. विरोधकांनी देखील यावरून सरकारला घेरल्याचं दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर सरकारवर होणाऱ्या आरोपांच खंडन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केलं आहे. मोदी यांनी लोकसभेत प्रदीर्घ भाषण केल. सुरुवातीला विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर मोदींनी आपलं भाषण कायम ठेवलं. तर, काही सदस्यांनी सभात्याग देखील केला.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काँग्रेसच्या खासदारांकडून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले डागले आहे. ‘सध्याच्या घडीला काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की, हा पक्ष धड स्वत:चं भलं करु शकत नाही आणि देशाचंही भलं करू शकत नाही’, असे म्हणत नरेंद्र मोदी कॉंग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- परतूरच्या चोरट्यांनी पळविली ४० क्विंटल तूर!
- देशाला विकणारे ‘क्रॉनीजीवी’ आहेत; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
- मावळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक प्रकार आला समोर
- ‘राणेंची ठाकरेंना गिफ्ट देण्याची कुवत राहिलेली नाही’
- …तर महाराष्ट्र सरकारने आम्हाला देखील अटक करावी; फडणवीस कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
