🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद-बीड मार्गावर चितेगाव शिवारात असलेले गोदाम फोडून २ लाख रुपये किमतीची तब्बल ४० क्विंटल तूर चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एका टोळीतील तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. इलियास सुलेमान खान, जब्बार बुढण पठाण आणि रवि लक्ष्मण वाहुळे अशी आरोपींची आहेत. यातील पठाण हा जालन्याच्या परतूर तालुक्यातील श्रीपत धामनगाव तर रवि हा पिंपळी धामणगावचा रहिवासी आहे. या टोळीतील कबीर बुढाण आणि गोपाल उर्फ टोपी बोरुडे हे दोन चोरटे फरार आहेत.
मनिष उर्फ अनिल जगनलाल साहुजी (रा. टिव्ही सेंटर) हे भुसार माल खरेदी करुन त्याची विक्री करतात. साहुजी यांनी चितेगाव शिवारातील निलेश गावंडे यांचे बीड-औरंगाबाद रोडवरी गोदाम किरायाने घेतले आहे. त्यात ते धान्य साठवून ठेवतात. १० जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास साहुजी यांनी गोदामात तुरीच्या ८० गोण्या ठेवल्या होत्या. ७ फेब्रुवारी रोजी साहुजी यांनी गोदाम उघडून पाहिले असता, तुरीच्या ६५ गोण्या चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, इलियास खान, जब्बार पठाण, कबीर पठाण आणि गोपाल उर्फ टोपी यांनीच गोदाम फोडून चोरी केली असल्याची स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी इलियास खान याला अटक केली. त्याची चौकशी केली असता, त्याने सदरील चोरी ही जब्बार पठाणच्या मदतीने केल्याची कबुली दिली. चोरलेली तुर ही रवि वाहुळे व माजलगाव (जि. बीड) येथील बाजार समितीतील निखील ट्रेडींग येथे विक्री केल्याचे सांगितले. त्यानूसार पोलिसांनी वरील तिघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तुरीच्या गोण्यांपैकी ३८ गोण्या जप्त केल्यात.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- गणेश नाईक फासे पलटण्याच्या तयारीत; शिवसेनेत गेलेल्या नगरसेविकेची ‘घरवापसी’
- इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना अन् आता कर्णधार कोहलीला आणखी एक धक्का !
- फडणवीसांनी घेतलेल्या आणखीन एका निर्णयात ठाकरेंकडून बदल
- 2025 सालापर्यंत अपघातांच्या प्रमाणात भारतात 50% घट होणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
