पुणे : राज्यात काही दिवसांपूर्वीचा ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. पुण्यातील मावळमधील टाकवे गावातही ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. मात्र निवडणुकीनंतर हे गाव अचानक एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलं आहे. कारण टाकवे गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यामधील टाकवे गावात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने जादूटोणा होत असल्याचा दावा केला जात आहे. 16 फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंच यांची निवड होणार आहे. सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा केला जात असल्याचं बोललं जातं.
अविनाश मारुती असवले यांनी याबाबत वडगाव मावळ पोलिसात तक्रार दिली आहे.मावळ तालुक्यातील टाकवे गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, अविनाश यांचे चुलते भूषण असवले आणि सहकारी ऋषिनाथ शिंदे यांची नावे लिंबावर लिहून लिंबाला खिळे मारले. ते खिळे मारलेले तीन लिंबू इंद्रायणी नदीतील पिंपळाच्या झाडाला ठोकले.
एकीकडे अनेक समाजसुधारक अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करीत आहेत तर दुसरीकडे असे प्रकार समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर लिहून खिळे मारत भीती पसरवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून समाजात अंधश्रद्धा पसरविणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- दरबार भरला पण राजाची प्रतिक्षा! पोलीस आयुक्तांमुळे नागरिक ताटकळले
- चहावाल्याच्या मुलाने मिळवले जिल्ह्यातील पहिले सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत धडक
- फडणवीसांनी घेतलेल्या आणखीन एका निर्णयात ठाकरेंकडून बदल
- दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
