Share

मागितलं तरच सरकार देणार, हा काळ गेला; लोकसभेत मोदींची जोरदार फटकेबाजी

Published On: 

नवी दिल्ली : देश कोरोनातून सावरत असला तरी सद्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढत आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. ७७ दिवस उलटून देखील शेतकरी व केंद्र सरकार यांच्यातील कोंडी कायम आहे. विरोधकांनी देखील यावरून सरकारला घेरल्याचं दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर सरकारवर होणाऱ्या आरोपांचा खंडन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केलं आहे. मोदी लोकसभेत प्रदीर्घ भाषण करत आहेत. सुरुवातीला विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर मोदींनी आपलं भाषण कायम ठेवलं. तर, काही सदस्यांनी सभात्याग देखील केला.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्याचं समर्थन केलं असून विरोधक मुद्दामून शेतकऱ्यांच्या मनात चुकीची माहिती पेरून तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. तर, शेतकऱ्यांची मागणी नसताना हे आरोप त्यांच्यावर लादले जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याचं देखील खंडन मोदींनी केलं आहे. आज पर्यंत समाजाच्या सुधारणांसाठी अनेक कायदे आणले गेले, या कायद्यांची मागणी समाजाने केली नव्हती. मात्र, समाजावर होणार चांगला परिणाम लक्षात घेता हे कायदे करण्यात आले.

बालविवाह, बाल कामगार असे अनेक कायदे करण्यात आले. समाजाच्या सुधारणेसाठी कायदे करण्यात राजा राम मोहन रॉय यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांनी योगदान दिलं आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यात यावा अशी मागणी कुठल्याच शेतकरी संघटनेने केली नव्हती तरी देखील आम्ही प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना पैसे मिळतील यासाठी शेतकरी सन्मान योजना पारित केली. त्यामुळे, फक्त नागरिकांनी मागणी केली तरच कायदे करायचे ते दिवस गेले. लोकशाही आहे, त्यामुळे समाजाच्या फायद्याचे कायदे करणे गैर नाही, असं म्हणत मोदींनी शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!