Share

‘सर्वोत्कृष्ट ‘आंदोलनजीवी’ हे महात्मा गांधी होते’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेला संबोधित करताना  कृषी कायद्यावर आपली भूमिका मांडली. देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत.

देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात’, अशा शेलक्या शब्दांत उपद्रव माजवणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला होता.

आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी म्हटल्याने, त्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. पंतप्रधानांच्या या शब्दावरून नवा वाद निर्माण झालाय. विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या आंदोलनांशी निगडीत व्यक्तींनी यावर भाष्य केले आहे. दरम्यान, देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी यावर भाष्य केले आहे. ‘होय, मी आंदोलनजीवी आहे आणि त्याचा मला गर्व आहे’ असं म्हणत चिदंबरम यांनी मोदींवर पलटवार केला आहे. ‘मला आंदोलनजीवी असल्याचा गर्व आहे. सर्वोत्कृष्ट ‘आंदोलनजीवी’ हे महात्मा गांधी होते’, असे टि्वट चिदंबरम यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!