मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देशाचं आर्थिक बजेट ते शरजिल प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील टीकास्त्र सोडल्याचं दिसून आलं. तर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि राहुल गांधी यांनी अर्थसंकल्प व शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर केलेल्या टीकेवरून त्यांची खिल्ली देखील उडवली आहे.
‘अर्थसंकल्पात गरीबांसाठी काहीच देण्यात आलेलं नाही. गरीबांच्या हातात रोख रक्कम येण्याची बात सोडाच, पण मोदी सरकार आपल्या काही भांडवलदार मित्रांना देशाची संपत्ती हँडओव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केला होता. तर, नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर टीका करताना ‘आंदोलनजीवी’ असा शब्द वापरला होता.
यावरून काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगपाखड केली आहे. ‘‘क्रॉनीजीवी आहेत ते, जे देशाला विकत आहेत.’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधींच्या या टीकेवर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ‘राहुल गांधी यांना अर्थसंकल्पाविषयी कोणीतरी प्रतिक्रिया लिहून देतं आणि ते वाचून दाखवतात, त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी वेगवेगळे आकडे सांगितल्याचं गेल्या वेळी पाहिलंय. त्यांनी बजेटमधील कोणतेही पाच आकडे सांगावेत, क्रॉनीजीवीचा अर्थ सांगावा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ,’ असं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांना आव्हानच दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ते आम्हाला कोर्टात जाऊ देणार नाहीत, अजितदादांचा राज्यपालांना सूचक इशारा !
- गणेश नाईक फासे पलटण्याच्या तयारीत; शिवसेनेत गेलेल्या नगरसेविकेची ‘घरवापसी’
- ‘राणेंना पुन्हा एकदा धडा शिकवण्याची वेळ आली’
- नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं; नाना पटोलेंची खोचक टीका
- पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भावूक झाले तर आनंद होईल – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
