Share

पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भावूक झाले तर आनंद होईल – अजित पवार

Published On: 

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे झालेल्या विकासकामांच्या आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार राज्यसभेच्या खासदारांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना निरोप देताना मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

गुलाम नबी आझाद यांच्या तत्परतेची एक आठवण सांगताना मोदींना भावना रोखता आल्या नाहीत. ते क्षणभर थांबले आणि नंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. मोदी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भावूक झाले तर आनंद होईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

‘पंतप्रधान राज्यसभेत गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना भावूक झाले, असेच ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल.’ असं अजित पवार म्हणेल. दरम्यान, नाशिकमधील बैठकीत बैठकीत त्यांनी उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा आढावा घेतला. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्ह्यातील आमदार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!