नवी दिल्ली: २६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली.
या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चा वेळी आंदोलकांनी घातलेल्या हैदोसाला दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. आंदोलकांना भडकावल्या प्रकरणी राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर, योगेंद्र यादव यांच्यासह ३७ शेतकरी नेत्यांवर देखील विविध प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान. आता प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार आणि लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकविल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी रात्री पंजाबमधील होशियारपूरमधून इक्बाल सिंग याला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी इक्बाल सिंग याच्यावर 50,000 रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
दरम्यान, याआधी या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुरारी येथे आणखी पाच लोकांना अटक केली आहे. सुरजीत उर्फ दिपू (वय 26), सतवीर सिंग उर्फ सचिन (32), संदीप सिंग (35) देवेंद्र सिंग (35) आणि रवी कुमार (वय 24) यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यातील तीन जण नेहरू विहार आणि दोन रोहिणीचे आहेत. याचबरोबर, लाल किल्ल्यावर हिंसाचार भडकवणारा अभिनेता दीप सिद्धूला काल दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर सुखविंदर सिंग याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. तर लक्खा सिधाना शोध सुरु आहे.
- महत्वाच्या बातम्या
- विना अनुदानित शिक्षकांसाठी संभाजी ब्रिगेडचं बीडमध्ये धरणे आंदोलन
- ‘राजकीय कुरघोडीसाठी इतका करंटेपणा कुठून येत असेल?’
- जयसिद्धेश्वर यांच्या अडचणीत वाढ; खासदारकी धोक्यात !
- कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
- कणखर नेता अशी प्रतिमा असलेले मोदी ‘या’ प्रसंगात देखील झाले आहेत भावूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
