Share

विना अनुदानित शिक्षकांसाठी संभाजी ब्रिगेडचं बीडमध्ये धरणे आंदोलन

Published On: 

बीड : विना अनुदानित शिक्षकांसाठी संभाजी ब्रिगेड कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. अंशतः अनुदानित अतिरिक्त शिक्षकांच्या सेवा जिल्हा परिषदेच्या सेवेत सेवेत समाविष्ट कराव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

या धरणे आंदोलनाला माजी आमदार प्राध्यापक सुनील धांडे, महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्रीराम बहिर, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे, शिक्षण संस्थाचालक गोविंद वाघ, उत्तम वाघ, उत्तम पवार, शिक्षक नेते शेख मुसा, बुलंद छावाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बहिर, उदयनराजे सेनेचे विजय लव्हाळे, संभाजी सुर्वे, मळीराम यादव, सतीश कापसे, डॉ. रमेश शिंदे, मुख्याध्यापक गणेश वाघ, भाऊसाहेब आवळे, शिवसंग्राम चे गणेश धोंडरे, युवा नेते गणेश नाईकवाडे, तत्वशील कांबळे आदींसह विविध संघटनेच्या आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.

राज्यात विनाअनुदानीत शिक्षक इमाने इतबारे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. या शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कर्मचारी संघटना बीड जिल्हा यांच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंशतः अनुदानित अतिरिक्त शिक्षकांच्या सेवा जिल्हा परिषदेच्या सेवेत समाविष्ट कराव्यात, या मागणीसह विनाअनुदानी शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!