Share

दुरावत चाललेल्या ओबीसी मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळविण्याचे भाजपने पुन्हा सुरु केले प्रयत्न

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –राज्यातील 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याविषयी प्रचंड आकर्षण असून अशा नवमतदारांशी संपर्क साधून त्यांचे ‘युवा वाँरिअर’ असे नवे संघटन भाजपातर्फे उभे करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधे भाजपतर्फे येणार्या काळात ओबीसी हक्क परिषदा घेण्यात येणार आहेत.

विद्यमान आघाडी सरकार मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावत असल्याचा आरोप भाजपकडून वारंवार होत असतो.दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाज भाजपपासून दुरावता कामा नये यासाठी पुरेपुर प्रयत्न भाज्कडून होत आहेत.कारण ओबीसी दुरवल्याचा फटका भाजपला अगदी अलीकडे झालेल्या विधान परिषदेच्या पदवी आणि शिक्षक मतदार संघात बसला आहे.हे लक्षात घेवून पुन्हा या मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे.

नुकतीच महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये दिनांक 8 आणि 9 रोजी झालेल्या दोन दिवसीय योजना बैठक झाली आहे.या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि केंद्रातील ४० हून अधिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

येणाऱ्या काळात पक्षाची वाटचाल, विस्तार, विविध आघाड्य़ांच्या माध्यमातून पक्षाची वाढ, आगामी नगरपरिषदा, महापालिका निवडणूकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळावे म्हणून रणनिती निश्चित कऱणे, राज्यातील ३ सत्ताधारी पक्षाविरोधात एक भाजप असा सामना झाला तरी निवडणूकांमध्ये पक्षाला मोठे यश कसे मिळेल. शतप्रतिशत भाजपाच्या यशाची सविस्तर चर्चा, नियोजन व योजना या बैठकीत निश्चीत करण्यात आल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून जनतेवर होत असलेला अन्याय व त्यासाठी जनतेच्या प्रश्नांसाठी भाजपने करावयची आंदोलने याबाबतही नियोजन या बैठकीत करण्यात आले.

राज्यातील ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात नीट न मांडल्याने मराठा आरक्षणाला नख लागले. आता ओबीसी समाजाला आणि ओबीसी घटकाला घटनेने मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री भूमिका घेत आहेत त्यामुळे अशा ओबीसी घटकाला संविधानाने दिलेल्या आरक्षणासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यामंध्ये भाजपातर्फे येत्या काळात ओबीसी हक्क परिषदा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!