Share

फक्त गुलाम नबीच नव्हे तर पवार,कंगना,उदयनराजे यांच्यासह ‘या’ दिग्गजांना आठवलेंनी दिली आहे ऑफर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा राज्यसभेला संबोधित केले. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार राज्यसभेच्या खासदारांना निरोप देण्यात आला.

यावेळी मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या आठवणींना उजाळा दिला. एका दहशतवादी घटनेचा संदर्भ देताना मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभेच्या सदनातील वातावरण काहीसं भावूक झालेलं असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र, सारे चित्र बदलून टाकले. आठवले यांनी आझाद यांच्यावर लिहिलेली एक कविता सदनात वाचून दाखवली. आठवलेंनी त्यांच्या खास शैलीत कविता सादर करण्यात सुरुवात केल्याने, राज्यसभेतील सर्वच सदस्यांसह खुद्द गुलाम नबी आझादही हसू आवरू शकले नाहीत.

आठवलेंनी लिहिलेल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हापुन्हा या सदनात यावं अशी इच्छा आठवलेंनी व्यक्त केलीय. जर काँग्रेस तुम्हाला राज्यसभेत घेऊ इच्छित नाही, तर आम्ही तयार आहोत, असं म्हणत थेट आझाद यांनाच ऑफर दिली. आठवलेंनी दिलेली ऑफर ऐकून गुलाम नबी आझाद यांनाही हसू आलं.आठवलेंनी अशा प्रकारे एखाद्या नेत्याला पक्षात येण्याची किंवा एनडीएमध्ये येण्याची ऑफर देण्याची ही काही पहिली वेळ नाही आठवलेंनी या आधी अनेकांना अशा ऑफर्स दिल्या आहेत. खा.शरद पवार,खा.उदयनराजे भोसले,कंगना राणावत यांच्यासह अनेक दिग्गज लोकांचा यात समावेश आहे.

उदयनराजे भोसले
रामदास आठवले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं उदयनराजेंना तिकीट नाकारल्यास त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवावी अशी ऑफर त्यांनी दिली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती करत ऑफर दिली होती की त्यांनी शेतकऱ्यांसाठी एनडीएमध्ये यावं, त्यांना केंद्रात सत्ता मिळेल. शिवसेना आमच्यासोबत आली नाही नाही तर राष्ट्रवादीने भाजप-रिपाइंसोबत यावं. रिपाइं याआधीही राष्ट्रवादीसोबत होती. त्यामुळं भाजप-राष्ट्रवादी आणि रिपाइं असं सरकार महाराष्ट्रात बनवू शकतो अशी ऑफर त्यांनी दिली होती.

छगन भुजबळ
छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या मागे चर्चा सुरु होत्या त्यावेळी सेनेतून भुजबळ यांना विरोध होऊ लागला होता. भुजबळ यांच्यासाठी शिवसेनेचे दार बंद असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांना रामदास आठवले यांनी ऑफर दिली. शिवसेना जर छगन भुजबळ यांना पक्षात घेत नसेल तर त्यांनी सरळ रिपाइंत यावे अशी ऑफर आठवले यांनी दिली. ज्यांना सेना-भाजपाचा पर्याय निवडायचा नाही त्यांनी रिपाइंचा पर्याय निवडावा असेही आठवले यावेळी म्हणाले. छगन भुजबळ हे बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत त्यांचे आणि माझे संबंध फार पूर्वीपासून चांगले आहेत त्यांना शिवसेना पक्षात घेत नसेल तर त्यांनी रिपाइंत यावे ते आरपीआयमध्ये आले तर आरपीआयची ताकद वाढेल असेही आठवले म्हणाले होते .

कंगना रणौत
रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतची भेट घेतली . या भेटीदरम्यान आठवले यांनी कंगनाला थेट ऑफर दिली. कंगनाने भाजप किंवा आरपीआयमध्ये प्रवेश केल्यास तिचं स्वागत आहे असं आठवले यांनी म्हटलं होतं. आपल्याला राजकारणात प्रवेश करायचा नाही आणि आवडही नाही असं कंगनाने सांगितलं . मात्र तिची इच्छा असेल तर तिचं भाजप किंवा आरपीआयमध्ये स्वागत असल्याचं त्यांनी म्हटलं.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते त्यावेळी त्याच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरु होती. खडसे राष्ट्रवादी जाणार कि नाही याबाबत अनेक तर्क लढवले जात असताना आठवले यांनी खडसे यांना देखील आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!