Share

पिशोर ग्रामपंचायतीत संजना जाधव यांचा हर्षवर्धन गटावर सर्जिकल स्ट्राईक!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दणका देत त्यांच्या अर्धांगिनी संजना जाधव यांनी केवळ दोन सदस्य असताना देखील उपसरपंचपद आपल्या गटाकडे राखले आहे. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनेलचे ४ पैकी २ सदस्य फुटल्याने त्यांच्यावर संजना जाधव यांनी हर्षवर्धन जाधवांना निवडणुकीच्या रिंगणात शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.

जाधव कुटुंबातील वादामुळं चर्चेत आलेल्या पिशोर ग्रामपंचायत निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागू होत. पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीवेळी पुण्यातील मारहाण प्रकरणात हर्षवर्धन जेलमध्ये होते. त्यामुळं त्यांची धुरा खांद्यावर घेऊन त्यांचा मुलगा आदित्यवर्धन याने या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उतरवले होते. तर संजना जाधव यांनी पिशोर ग्रामपंचायत निवडणूकीत आठ उमेदवार उभे केले होते. त्यामुळं आई विरुद्ध मुलगा असा हा सामना रंगला होता.

दरम्यान, पिशोरमध्ये इतर दोन पॅनेलही तितक्याच ताकदीचे उभे होते. त्यामुळे पिशोरमध्ये झालेल्या चौरंगी लढतीत पुंडलिकराव डहाके यांच्या पॅनेलचे ७, हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनेलचे ४, राजू मोकासे आणि नारायण जाधव यांचे ३, संजना जाधव यांचे २ आणि १ अपक्ष असे सदस्य निवडून आले. मात्र, केवळ दोन सदस्य असेल्या संजना जाधव यांनी हर्षवर्धन जाधव यांच्या गटाला दणका देत उपसरपंच पद आपल्याकडे राखले आहे. जाधव कुटुंबातील वादानंतर संजना जाधव यांनी आपण राजकारणातही मागे नसल्याचं दाखवून दिलं, अशी चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!