🕒 1 min read
सोलापूर : डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांचाही महास्वामी यांनी पराभवाची केला आहे.
मात्र, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना आपली खासदारकी वाचवण्याची आता धडपड करावी लागत आहे. शिवाचार्य यांचं जात वैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केलय. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला आता समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे शिवाचार्य यांची खासदारकी धोक्यात आली आहे.
दरम्यान, शिवाचार्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवाचार्य यांचा बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. शिवसिद्ध बुळा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
‘खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता. यानंतर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी जातीचा बनावट दाखल तयार केला होता. हा बनावट दाखला बनवणाऱ्या शिवसिद्ध बुळा याला पोलिसांनी अटक केली आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. शिवसिध्द बुळा याने शिवाचार्य यांचा जातीचा बनावट दाखला तयर केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मायदेशातील पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक दणका !
- हेच खरं यश आहे; गडचिरोलीतील ‘हा’ बदल बघून तुकाराम मुंढेंनी केलं भरभरून कौतुक !
- मेहनत फळाला आली : UPSC परीक्षेत साताऱ्याचा प्रथमेश पवार देशात तिसरा
- कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
- चित्रपट सृष्टीवर शोककळा ! ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
