Share

‘राजकीय कुरघोडीसाठी इतका करंटेपणा कुठून येत असेल?’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.

मात्र, देशाबाहेरील कलाकारांनी या आंदोलनावर भाष्य केल्यानंतर भारतातील सेलिब्रिटींच्या एका गटाने देशातील एकता जपणं महत्वाचं असल्याचं म्हणत बाहेरच्या सेलिब्रिटींनी यात नाक खुपसू नये अशी समज दिली होती. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह माजी अडल्ट स्टार मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं.

हे प्रकरण सद्या जगभरात गाजत आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केलेल्या सेलिब्रिटींच्या ट्विटचा आशय सारखाच आहे. हा आशय सारखा असल्याने त्यांना कोणी हे करायला सांगितले का ? असा सवाल सामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली.

दरम्यान, यावर भाजप नेते व पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले आहे. ‘वंदनीय लतादिदी, सचिन यांच्यासारख्या अस्सल रत्नांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करुन देशासाठी केलेल्या ट्विटच्या चौकशीची घोषणा महाविकास आघाडी सरकारनं केली. राजकीय कुरघोडीसाठी इतका करंटेपणा, सुडपणाची भावना कुठून येत असेल?’, अशा आशयाचे ट्वीट करत मोहोळ यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!