Share

‘महाराष्ट्रातील भाजपचे नेते उठसुठ आंदोलन करत होते, त्यांना काय म्हणायचं ते आम्हाला आता कळलं’

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यामधली कोंडी अद्याप कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना कृषी कायद्यां विरोधातील आंदोलनावर मौन सोडलं.

देशात आंदोलनजीवी ही नवी जमात उदयास आली आहे. त्यापासून देशातील जनतेने सावध राहायला हवं असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हे आंदोलनकर्ते वकिलांच्या आंदोलनात असतात, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात,’ असे मोदींनी म्हटले. ‘सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात,’ असा टोला मोदींनी लगावला आहे.

नरेंद्र मोदींच्या आंदोलनजीवी या शब्द प्रयोगानंतर विरोधी नेत्यांनी त्यांना चांगलंच लक्ष्य केलं आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत बोलताना मोदींच्या या शब्दाचा समाचार घेत भाजपच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला होता. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते, त्यामुळे त्यांना काय म्हणायचं हे मोदींच्या या शब्दामुळे समजलं.’ असा चिमटा कोल्हेंनी काढला.

तर, ‘ज्या कष्टकरी वर्गासाठी बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही ठामपणे उभे राहतात ते मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहेत.ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो.’ अशी टीका देखील त्यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!