Share

माझ्यावर केलेली कारवाई राजकीय दबावापोटी: नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नगराध्यक्षांवर नगर परिषद कायद्याअंतर्गत अपात्रतेची केलेली कारवाई ही केवळ राजकीय दबावापोटी असल्याचा आरोप नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. कुठल्याही अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीवर पाठवावे, अशी मागणी करणे चुकीचे कसे ठरु शकते. लोकप्रतिनिधी म्हणून केलेली मागणी ही चुकीची होऊ शकत नाही त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिलेले निर्देश हे चुकीचे आहे, हेतुपुरस्सर आहेत, असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

नगरपालिकेत सुरू असलेल्या कामांवर दर्जेदार कामे व्हावीत म्हणून एखाद्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्याची मागणी करणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून आपले कर्तव्य होते, परंतु विरोधकांनी याबाबत कामात खोडा घालण्याच्या उद्देशाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट केले. तसेच जिल्ह्यात केवळ शिवसेनेच्या नगरपालिकेला टार्गेट केले जात आहे. विकास कामात खोडा घालणाऱ्या विरोधात आपण मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत असे ते म्हणाले.

एखादे प्रकरण न्यायालयात सुरू असताना हस्तक्षेप करावा का? एखाद्या लोकप्रतिनिधीला अपात्र करण्यासाठी कोणती कारवाई करावी लागते हे देखील जिल्हाधिकारी रेखावार यांना माहित नसावे. त्यांनी दिलेले निर्देश हे केवळ राजकीय दबावापोटीच आहेत. असे आरोप क्षीरसागर यांनी केले आहे. याबाबत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. स्वतः पदावर असताना जिल्हाधिकारी रेखावर यांनी अशी कारवाई न करता जाताजाता कुणाला निर्देश दिले ? बदली झाल्यानंतर १५ दिवसाने हे निर्देश काढलेच कसे? हाही संशोधनाचा भाग आहे. असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!