🕒 1 min read
औरंगाबाद : मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी येत्या २२ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी सोमवारी (दि.८) पत्रकार परिषदेत दिली.
मातंग समाज हा शिक्षणाच्या प्रवाहापासून दुरावलेला समाज असून या समाजाला अंधश्रध्देने घेरले आहे. मातंग समाजातील अंधश्रध्दा कमी करून या समाजाला शैक्षणिक, सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने गेल्या २९ वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करावी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ पुन्हा सुरू करण्यात यावे, दलित समाजातील युवकांनी घेतलेले कर्ज माफ करावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला सक्षम करावे आदी विविध मागण्यांसाठी येत्या २२ फेब्रुवारी रोजी दलित महासंघाच्या वतीने जिल्हधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लाक्षणिक राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रा. सकटे यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेस दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस सुरेश चव्हाण, महिला आघाडी प्रमूख प्रा. पुष्पलता सकटे, मराठवाडा संपर्क प्रमुख राहुल पाटोळे, दलित महासंघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ सदाफुले, जालना जिल्हाध्यक्ष सुभाष आठवले आदींची यावेळी उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पवारांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ’
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला कधीच विरोध केला नाही – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
