Share

‘बंद खोलीत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना आश्वासन दिलं ते खरं असावं’

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं काल सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी, अमित शाह यांनी महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील घणाघात केला होता.

‘उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही बंद खोलीचं राजकारण केलं नाहीये. मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे. मी कधीही घाबरत नाही जे होतं ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असं कोणतंही वचन दिलं नव्हतं, हेच सांगायला मी इथं आलोय’ असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे हे खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता.

या आरोपांवर शिवसेना नेत्यांनी भाष्य केल्यानंतर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘त्यांनी महाविकास आघाडीवर वैफल्य मनस्थितीमुळे टीका केली आहे. अमित शाह यांनी भाजपच्या कारखानदारांना सरकारकडून त्रास दिला जात आहे असा आरोप केला होता. ‘हा आरोप मुश्रीफांनी खोडून काढला आहे. ‘कारखानदारांना त्रास दिला जातो हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांनी अभ्यास करून बोलायला हवं होतं. त्यांना अपूर्ण माहिती मिळाली आहे. सरकारने सगळ्याच कारखानदारांना थक हमी दिली आहे. कोणतीही गटबाजी केलेली नाही.’ असं म्हणत मुश्रीफ यांनी शाहांचे आरोप खोदून काढले आहेत.

तर, पुढे त्यांनी ठाकरे-शाह यांच्यातील बंद खोलीतील चर्चेवर देखील भाष्य केलं आहे. ‘ उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत अमित शाह यांनी आश्वासन दिलं ते खरं असावं. कारखानदारांच्या बाबतीत शाह इतकं धादांत खोटं बोलत असतील तर शिवसेना आणि भाजपमध्ये काय झालं असेल? त्याबाबतही शाह खोटंच बोलत असतील. शिवाय शाहांना वाटलं नसेल की, शिवसेना कठोर होईल आणि युती तोडेल,’ असा टोला देखील हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!